स्टार्टअप कंपन्यांमध्ये महाराष्ट्राची आघाडी
वर्षभरात ४० टक्क्यांनी वाढ

0


मुंबई. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांच्या (startup companies) स्थापनेत महाराष्ट्रात (Maharashtra) मोठी वाढ नोंदविली गेली आहे. महाराष्ट्रात सुरू झालेल्या स्टार्टअप्सची संख्या २०२१ मध्ये ३,७२१ वर पोहोचली आहे. २०२० मध्ये अशा मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या २,६८५ होती. २०२१ मध्ये त्यात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२२ पर्यंत भारतातील (India startup Business) एकूण मान्यताप्राप्त स्टार्टअप कंपन्यांची संख्या १४,००० इतकी होती. यातील सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. २०२१ मध्ये स्टार्टअप्सची स्थापना करण्यात पुणे देशात अव्वल ठरले आहे. औरंगाबादमध्ये २०२० मध्ये केवळ ४० स्टार्टअप कंपन्या कार्यरत होत्या. ही संख्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह ८५ झाली आहे. १२२ स्टार्टअपसह नाशिक हे एक केंद्र म्हणून उदयास आले तर, मुंबई उपनगरांत २८७ कंपन्या आहेत.


भारत हा परंपरा जोपासणारा देश असल्याची जगभरात मान्यता आहे. जगातील नाविन्यपूर्ण बाबी इथे झटकन स्वीकरल्या जात नसल्याचे मानले जाते. पण, भारतातही मोठ्या प्रमाणावर टॅलेंट आहे. नवीन कल्पनांवर आधारित उद्योग, व्यवसाय सुरू झाल्यास देशात मोठे परिवर्तन घडून येऊ शकते. हीच बाब लक्षात घेत सरकारने स्टार्टअपवर भर दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रोत्साहन मिळत असल्याने नवउद्योजक नव्या कल्पनांसह बाजारपेठेत उतरत आहेत. महाराष्ट्र त्यात अग्रेसर असल्याचे सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.


देशात ६५,८६१ एकूण स्टार्टअप


मार्च २०२२ पर्यंत भारतात कार्यरत एकूण स्टार्टअप कंपन्यांची संख्या ६५,८६१ असली तरी, त्या सर्वांना वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) द्वारे मान्यता मिळालेली नाही. तथापि, गेल्या सहा वर्षांत त्यांची वाढदेखील अभूतपूर्व झाली आहे. २०१६-१७ मध्ये अशा कंपन्यांची संख्या ७२६ होती. मोदी सरकारने १६ जानेवारी २०१६ रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केल्याने ही संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्याच मोठ्या शहरांमध्ये स्टार्टअपचे जाळे विणले जात असले तरी पुढच्या टप्प्यात त्या व्यवसायांवर आधारित छोट्या व्यवसायांचे जाळे गावखेड्यांर्यंत विणले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

*रैवीओली आणि स्टफ मशरूम रेसिपी | Ravioli & Stuffed Mushrooms Recipe | Episode 31 | Shankhnaad News*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा