Home LOCAL NEWS आत्मनिर्भर भारत व ‘व्हिजन 2047’ च्या अनुषंगाने वेकोलि मध्ये “चिंतन शिबिर”चे आयोजन

आत्मनिर्भर भारत व ‘व्हिजन 2047’ च्या अनुषंगाने वेकोलि मध्ये “चिंतन शिबिर”चे आयोजन

0

 

नागपूर (Nagpur) दि. 23 जानेवारी 2026:- ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारत या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या अनुषंगाने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) ची भावी दिशा रेखांकित करण्याच्या उद्देश्याने दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी “चिंतन शिबिर” आयोजित करण्यात आले. भारताच्या व्हिजन 2047 शी सुसंगत अशी वेकोलिची भावी दिशा ठरविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या चिंतन शिबिरात कंपनीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला तसेच उत्पादन, कोळसा डिस्पॅच, सुरक्षा, खर्च कार्यक्षमता, शाश्वत विकास आणि डिजिटायझेशन या प्रमुख क्षेत्रांना अधिक बळकटी देण्यासाठी स्पष्ट व कालबद्ध कृती आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व श्री जे. पी. द्विवेदी, अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक, वेकोलि यांनी केले. यावेळी श्री बिक्रम घोष, निदेशक (वित्त); डॉ. हेमंत शरद पांडे, निदेशक (मानव संसाधन); तसेच श्री अजय मधुकर म्हेत्रे, मुख्य सतर्कता अधिकारी यांची उपस्थिती होती.

मुख्यालय व वेकोलिच्या सर्व 10 क्षेत्रांतील सुमारे 125 अधिकारी या शिबिरात सहभागी झाले. यामध्ये क्षेत्रीय महाप्रबंधक, विभागप्रमुख तसेच युवा अधिकारी यांचा समावेश होता, ज्यामुळे विचारमंथन अधिक व्यापक व सर्वसमावेशक झाले.

या प्रसंगी सीएमडी श्री जे. पी. द्विवेदी यांनी सांगितले की, कोळसा खाण क्षेत्रात वेकोलिला भारताच्या व्हिजन 2047 शी सुसंगत बनविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, कोळशाची उत्कृष्ट गुणवत्ता आणि उच्च परिचालन कार्यक्षमता अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी स्पष्ट केले की उत्पादकता वाढविणे, प्रक्रिया सुलभ करणे, यांत्रिकीकरणाला चालना देणे आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे यांद्वारे वेकोलि परिचालन कार्यक्षमता अधिक मजबूत करत आहे. तसेच खर्च-परिणामकारक कार्य, संसाधनांचा विवेकी वापर आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण यांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. परिवर्तन व्यवस्थापन या संकल्पनेवर भर देत त्यांनी सांगितले की, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी परिवर्तन प्रक्रियेचा भाग बनल्यासच संस्था अधिक सक्षम, गतिमान आणि स्पर्धात्मक होऊ शकते.

निदेशक (वित्त) श्री बिक्रम घोष यांनी आपल्या भाषणात सामूहिक प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि नवोपक्रम यांच्या माध्यमातून वेकोलि भविष्यात उच्च कार्यक्षम व भविष्यसज्ज संस्था म्हणून उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.

निदेशक (मानव संसाधन) डॉ. हेमंत शरद पांडे यांनी वेकोलिच्या सध्याच्या व भावी योजनांची सविस्तर माहिती दिली. बदलत्या परिस्थितीत वेकोलि मध्ये माहिती तंत्रज्ञान व डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढविण्याची गरज असल्यावर त्यांनी भर दिला.

या वेळी मुख्य दक्षता अधिकारी श्री अजय मधुकर म्हेत्रे यांनीही आपले विचार मांडले.

चिंतन शिबिरादरम्यान विविध क्षेत्रीय महाप्रबंधाकांकडून एकूण 10 प्रेजेंटेशन करण्यात आली. यामध्ये ‘व्हिजन 2047’ साठीचा आराखडा, भूमिगत उत्पादन योजना, गुणवत्ता नियंत्रण, डिस्पॅच, एफएमसी, सुरक्षा, भू-संपादन व पुनर्वसन, पर्यावरण व वन परवाने, डिजिटायझेशन व एआयचा वापर, मानव संसाधन, वित्त आणि करार व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश होता. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सीएमडी, सर्व निदेशकांनी आणि मुख्य सतर्कता अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. खुल्या मंचावर विचार व सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.