समृद्धी महामार्गावरील अपघात 1 ठार, 3 जखमी,

0

भरधाव कार ट्रकवर धडकली, सिंदखेड राजा नजिकची दुर्घटना

सिंदखेडराजा. – अपघातमुक्त वाहतुकीचे सर्व प्रयत्न करूनही समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway ) अपघातांची मालिका कायमच आहे. या मार्गावर आतापर्यंत सुमारे ८०० लहान मोठे अपघात झाले असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. सर्वाधिक अपघात टायर फुटल्याने होत असल्याची बाब समोर आल्याने टायरची तपासणी करूनच वाहनांना पुढे सोडले जाऊ लागले आहे. सोबतच चालकांना वेगमर्यादेबाबत संपूर्ण कल्पना दिली जात आहे. वेगाला आळा घालण्यासाठी वेळेपूर्वी पोहोचलेल्या वाहनांना बाहेर निघता येणार नाही, असेही जाहीर करण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांनंतरही वेगावर निर्बंध घालणे काही शक्य होऊ सकले नाही. शुक्रवारी सकाळी ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार समोर असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली (speeding car hit the truck). या अपघातात एक जण ठार झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात समृद्धी महामार्गावरील सावरगाव माळ (Savargaon Mal) शिवारात शुक्रवारी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडला.

समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर चॅनल नंबर ३४६.५ व यूपी-६१-एटी-२६०८ या क्रमांकाचा ट्रक आपल्या साइडने जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या कार क्रमांक एमएच-०२-एफई-८८७६ चा चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ट्रकवर चालकाच्या बाजूने मागच्या भागावर आदळली. अपघात एवढा भीषण होता की कारचा समोरील भाग अक्षरशः चुरा झाला. या अपघातात डॉ. अब्दुल खालीक (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. अब्दुल हे मुंबईवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या आपल्या मूळ गावी जात होते. कारमध्ये त्यांचे कुटुंबीय होते. डॉ. अब्दुल यांची मुलगी मुस्कान खालीक (२४) गंभीर जखमी असून मुलगा अमन व पत्नी अमरीन हे दोघेही या अपघातामध्ये जखमी आहेत. जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारचालक दिनेश कुमार याने निष्काळजीपणे कार चालवून अपघात केल्याचे यासंदर्भातील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. महामार्ग पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पीएसआय उज्जैनकर, राणे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

 

अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |