राम भक्तांसाठी 1111 किलोचा लाडू

0

 

नागपूर  NAGPUR : अयोध्येत Ayodhya होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा, मंदिर लोकार्पण अभिषेक संदर्भात देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याच मालिकेत आज नागपुरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने 1111 किलो लाडू बनवला आहे. पूर्व नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पोटे यांनी स्वतःच्या दुकानात हा 1111 बुंदीचा लाडू बनवला.आज सकाळपासूनच कलश यात्रा काढण्यात आली.या कलश यात्रेमध्ये श्री रामाचा जय घोष करत वस्तीत फिरत लक्ष्मण पोटे यांचे दुकानात पोहचली. जिथे 1111 किलो चा लाडू बनविण्यात आला आहे. हा महाकाय लाडू भगवान श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात येणार असून नागपूरकरांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

राम लल्लाच्या चरणी 80 किलोची नंदक खडग तलवार कुणी दिली?

नवी मुंबई- अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलल्लासाठी अनेक उपहार देशभरातील रामभक्त पाठवत आहेत. नवी मुंबईतील शस्त्रप्रेमी नीलेश सकट यांनी श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी नंदक खडग तलवार तयार केली आहे. तब्बल 80 किलो वजनाची आणि 7 फूट 3 इंच एवढी लांब ही तलवार आहे. या तलवारीची पात पोलादाची असून मूठ पितळेची आहे. ज्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. या तलवारीवर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरले असून विष्णूला प्रिय असे शंख, पद्धम, चक्र, गदा देखील कोरण्यात आली आहे. मंदिराचा न्यायालयीन निकाल जाहीर झाल्यानंतर नीलेश यांनी ही तलवार बनवण्याचे ठरवले होते. यासाठी त्यांनी अग्नीपुराण आणि वाल्मिकी रामायण या ग्रंथांचे वाचन करून घरी स्वतः ही तलवार बनवली असून यासाठी त्यांना दीड महिन्यांचा कालावधी लागला आहे.