केंद्रशासित प्रदेशांमधे ₹9,800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प

0

 

देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे ₹9,800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या नवीन विमानतळांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरुपात होत आहे.

अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, कोल्हापूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन किंवा सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचे उद्घाटन होत आहे. आणि कडप्पा, हुब्बल्ली आणि बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी होत आहे.

यातील मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे – वार्षिक 6 कोटींहून अधिक प्रवाशांना सेवा देण्यासाठी नवीन विमानतळ/सुधारित टर्मिनल इमारती, दरवर्षी 95 लाख प्रवाशांना सेवा देण्याची एकत्रित क्षमता असलेल्या नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी.
टर्मिनल इमारतींचे डिझाईन आणि आतील भाग स्थानिक संस्कृती आणि स्थानिक वारशातून प्रेरित असणार आहे.

अशा या ऐतिहासिक सोहळ्यात कोल्हापूर येथील कोल्हापूर विमानतळ, नूतन टर्मिनल भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन व मा.एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.