
नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात घरात 3 मृतदेह आढळले आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Related posts:
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
नागपुरात १३ जून रोजी भव्य ‘कृष्ण भक्ती संध्या’चे आयोजन
May 22, 2026LOCAL NEWS


















