मंडप कोसळून 8 जण जखमी

0

 

(New Delhi ) नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी  : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंडप कोसळून 8 जण जखमी झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

यासंदर्भात माहिती देताना जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, याठिकाणी विवाह समारोहासाठी तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. स्टेडियमच्या गेट क्रमांक-2 मधून प्रवेश करताना आज, शनिवारी अचानक हा मंडप कोसळला. त्यावेळी मांडवाखाली असलेल्या 8 ते 10 लोकांवर हा मांडव कोसळला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी मांडवाखाली दबलेल्या 8 जणांना बाहेर काढले. तसेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताच्या वेळी बरेचसे कर्मचारी जेवणासाठी गेले होते त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले.