
आंतरराष्टीय स्तरावर आयुष कार्यक्रमामुळे आयुर्वेदशास्त्राचे महत्त्व वाढले आहे”असे प्रतिपादन डॉ. निवृत्ती राठोड,जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय,नागपूर यांनी स्थानिक महाकाळकर सभागृह, दत्तात्रयनगर,नागपूर येथे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा)नागपूर शाखा द्वारा आयोजित”धन्वंतरी जयंती व ९वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस”निमित्त गणमान्य चिकित्सकांचा”धन्वंतरी सन्मान-२०२४”सत्कार समारंभात केले.अध्यक्षस्थानी डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय,संपादक”पावन परंपरा”हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. दीपक सेलोकर(वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा),डॉ.रवींद्र बोथरा(केंद्रीय निमा सल्लागार),डॉ.मृण्मयी मासोदकर (केंद्रीय निमा वूमन्स फोरम सचिव),डॉ.मोहन येंडे(निमा महाराष्ट्र महासचिव),डॉ.मीनाक्षी सराटकर(निमा वुमन्स फोरम कोषाध्यक्ष-महाराष्ट्र)हे उपस्थित होते*
सर्वप्रथम आरोग्य देवता भगवान श्री धन्वंतरी पूजन-स्तवन-दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.निमा नागपूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. नितीन कान्होलकर यांनी स्वागतपर भाषण केले . यात राष्ट्रीय आयुर्वेद दिना निमित्त निमा नागपूर चे होणारे कार्यक्रमाबद्दल माहिती दिली . डॉ.रवींद्र बोथरा यांनी”निमा”संघटनेचे सिंहावलोकन केले तर डॉ.मोहन येंडे यांनी राज्यस्तरावर निमाद्वारा केलेल्या कार्याची माहिती दिली*
राष्ट्रीय आयुर्वेद दिवस”निमित्याने डॉ.अशोक मिश्रा,डॉ.संजय मानेकर, डॉ.प्रमोद मातकर,डॉ.विलास भालेकर,डॉ.प्रा.अर्चना दाचेवार,डॉ.प्रा.प्रज्ञा डाखोळे,डॉ.रवींद्र उदापुरे,डॉ.संजय माने,डॉ.प्रतिभा करपे ह्या ९ आयुर्वेद आणि डॉ. बुशरा फसीहा शेख या १युनानी चिकित्सकांचा शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला*
डॉ.दीपक सेलोकर यांनी अतिथीय भाषणातून राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे महत्त्व विशद केले तर डॉ.गोविंदप्रसाद उपाध्याय यांनी अध्यक्षीय भाषणातून जागतिक आरोग्य स्तरावर आयुर्वेदाचे वाढते महत्त्वावर सुंदर विश्लेषण केले
या अभिनव कार्यक्रमाचे संचालन डॉ.अभय कडू व डॉ.प्राजक्ता इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ममता रेवतकर,सचिव,निमा वुमेन्स फोरम यांनी केले* *धन्वंतरी जयंती कार्यक्रमाला डॉ. मनोहर जुमळे,डॉ.शांतीदास लुंगे,डॉ. शरद ठाकूर,डॉ.पंकज थूल,डॉ.वीणा फाये,डॉ.वैशाली चरडे,डॉ शीतल येंडे, डॉ.अर्चना जुमळे,डॉ. अर्चना कान्होलकर, डॉ.नारायण भेंडे,डॉ.संजय निकम,डॉ.अरुण फरकसे,डॉ.जीवेश पंचभाई,डॉ.दिलीप फाये, डॉ.जगमोहन राठी,डॉ.शैलेंद्र अग्रवाल,डॉ.विकास चिटमूलवार,डॉ.महाजन,डॉ सुरेश खंडेलवाल,डॉ.शाकीब हुसेन, डॉ.विवेक येवले,डॉ.अरविंद तलहा, डॉ.प्रशांत तुरणकर,डॉ.राकेश गोंडाणे,डॉ.इंतखाब आलम, डॉ.याकूब,डॉ.वैभव ठवकर,डॉ.मोहनीश गोखले आदी मान्यवरांसह समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते
👆प्रति,माननीय संपादक…कृपया प्रकाशनार्थ!विनीत-🙏डॉ. नितीन कान्होलकर अध्यक्ष ,निमा-नागपूर*














