
ममता बॅनर्जींनी दाखविला ठेंगा!
कोलकाता Kolkata -भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात इंडिया आघाडीच्या नावाने विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना बुधवारी मोठा धक्का बसला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि Trinamool Congress तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला.Mamata Banerjee ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममतांच्या या घोषणेने विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे बिहारमध्येही नितीशकुमार यांचेही तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे मानले जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी स्वतः प्रसार माध्यमांशी बोलताना संतप्त भावना व्यक्त करुन ही घोषणा केलीी. त्या म्हणाल्या की, आपण ज्या काही सूचना दिल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या. एवढे झाल्यावर आम्ही एकट्याने बंगालमध्ये लढण्याचे ठरविले आहे. आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष असताना काँग्रेसची न्याय यात्रा बंगालमधून जाणार असताना आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आली नाही. त्यांनी परस्पर जाहीरसभा देखील ठरवून टाकल्या. त्यामुळे आता आम्ही एकट्यानेच बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माझी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू, असे मी नेहमीच म्हटले आहे. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपचा पराभव करू.