
नागपूर NAGPUR – महावितरणच्या व्हीएनआयटी शाखा कार्यालयांतर्गत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ शेख इसुफ़ शेख रहमान यांना मारहाण करणा-या लक्ष्मीनगर येथील आकाश क्रिष्णा डकाहा या व्यक्तिविरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रिष्णा अशोक डकाहा या ग्राहकाने मागिल तीन महिन्यांपासून वीजेचे बील भरले नाही, त्यांच्याकडील 10,450 रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी शेख इसुफ़ शेख रहमान हे निशा तरेकर आणि हरिष तराळे या सहका-यांसमवेत गेले असता तेथे आकाशने थांबा पैसे घेऊन येतो म्हणुन सांगितले. अर्धा तास होऊनही तो काही प्रतिसाद देत नाही हे बघून पैसे द्या, अन्यथा वीजपुरवठा खंडित करु असे सांगत शेख इसुफ़ शेख रहमान वीजपुरवठा खंडित करण्यास खुर्चीवर चढले. मात्र, आकाश याने शेख इसुफ़ शेख रहमान यांना मागून ओढून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा या कारणास्तव बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Related posts:
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
नागपुरात १३ जून रोजी भव्य ‘कृष्ण भक्ती संध्या’चे आयोजन
May 22, 2026LOCAL NEWS


















