केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी

0

शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा,

(Mumbai)मुंबई- मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असतानाच गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट (Central Cabinet Expansion) घेतली. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाली असून मंत्रिमंडळात शिंदे गटातील किमान २ जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Eknath Shinde)एकनाथ शिंदे आणि (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट अनेक राज्यमंत्री पद येण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात नेमक्या कोणत्या खासदारास संधी द्यायची, याचा निर्णय शिंदे यांच्यावर सोपविला गेलाय.

शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थ दिसून येत आहे. या संदर्भात अनेक खासदार आणि आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये होते. महापुजा आटोपून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली. या दोन्ही नेत्यांची (Union Home Minister Amit Shah)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी रात्री उशिरा भेट झाली. लोकसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान मिळाल्यास शिंदे गटातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.