समृद्धीवर भीषण अपघात; तीन ठार

0

 

समृद्धी महामार्गावर आज (Samrudhhi Highway Accident) पहाटे अपघात झालाय. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

ट्र्रॅव्हल अहमदनगरहून रायपूरकडे जात होती. तेव्हा खासगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागली आणि अपघात (Samruddhi Highway Accident) झाला. सकाळी ५ वाजता दरम्यान हा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागल्यानं बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने अपघात झाला आहे.

अमरावती जिल्ह्यातील वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात आहे. यात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत (Samruddhi Highway) आहे. अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या संदर्भात अधिक तपास सद्या तळेगाव दशासर पोलीस करत आहेत.