काही वाईट केले नाही तर घाबरायचे कशाला ? -धर्मरावबाबा आत्राम

0

 

नागपूर-आ रोहित पवार यांना सूडबुद्धीने नोटीस कोण देणार? ही महत्वाची बाब आहे. ईडीची कारवाई योग्य की नाही ते लवकरच कळेल. त्यांनी वाईट केल नाही तर घाबरायच कशाला?उलट सहानुभूती मिळते का? यासाठी ते प्रयत्न करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला.
विरोधक असतील पण अजित पवारांचे नातेवाईक देखील आहेत, त्यामुळे काही पुरावा सापडला असेल म्हणून तपासासाठी बोलावलं आहे.
आता त्यांचं सरकार येईल हे स्वप्नच त्यांनी पाहावं. पण आम्ही 200 पार जाणारं आहोत. तीनही पक्ष बसून जागावाटपाचा योग्य निर्णय घेतील.
महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असून आमचं दिलेले टार्गेट कमी होणार नाही. त्याकरिता आम्ही काम करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आम्हाला 48 जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागायचे आदेश दिलेत. काँग्रेसला एकही जागा सोडणार नाही. एक निवडून आली गेल्यावेळी आता ती पण जागा ओढून घेणार असा इशारा दिला. महाविकास आघाडीची आता झोपायची वेळ आली आहे असा टोला लगावला.