जिल्हा मध्यवर्ती कारागृहाने राबविला 16 वर्षीय मुलांची गळाभेट उपक्रम
अमरावती(Amravati):अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षांपासून काही बंदी हे विविध कारणांमुळे शिक्षा भोगत आहेत. मुलांना आपल्या वडिलांना भेटता यावे यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने आज 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “शिक्षा बंद्यांच्या 16 वर्षीय मुलांची गळाभेट” ही आगळीवेगळी संकल्पना राबविली. अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये जे बंदी गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत अशा बंद्यांना आज त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. आपल्या मुलांना कित्येक वर्षानंतर भेटल्यानंतर बंदी आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले.यानंतर सुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी दिली.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा