शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख, ठाकरेंवर शिंदेंचे बाण

0

(MUMBAI)मुंबई-  (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. शिंदे म्हणाले, ते बाळासाहेबांची संस्कृती, शिकवण विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे.

खालच्या पातळीची भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत नाही. जे घरात बसून फेसबुक लाईव्ह करुन सूचना देत होते त्यांनी मला सांगू नये, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शरद पवारांनी देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या पुस्तकात लिहिले आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे. सरकार काम करणारे आहे. मागच्या सरकारसारखे फसवणारे नाही. शेतकऱ्यांना दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदतीचा निर्णय घेतला आहे. एनडीआरफमधील तरतुदीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे म्हणाले.