आम आदमी पार्टीला मिळणार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

0

नवी दिल्ली : गुजरात किंवा हिमाचलमध्ये आम आदमी पार्टीला आपला प्रभाव पाडण्यात अपयश आले असले तरी या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचे मानले जात आहे. 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार (AAP to get National Party Status) आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात दिल्लीत जंतरमंतर येथे झालेल्या 2011 मधील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व उदयास आले व त्यानंतर आम आदमी पार्टीची स्थापना झाली होती. या 10 वर्षाच्या कालावधीत ‘आप’ने दोन वेळेस दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकताना पंजाबमध्येही सत्ता मिळवली. आता दिल्ली महानगर पालिकेतही आपने सत्ता मिळवली असून गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाला फारशी समाधानकारक कामगिरी साध्य करता आलेली नसली तरी या पक्षाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे.

काय आहेत निकष ?


राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडे किमान तीन राज्यात लोकसभेच्या 2 टक्के म्हणजेच लोकसभेच्या 11 जागा राहणे अपेक्षित आहे. मात्र, आपकडे सध्या लोकसभेत एकही खासदार नाही. राज्यसभेत या पक्षाला प्रतिनिधित्व असून पक्षाचे तीन खासदार आहेत. मात्र, लोकसभेत खासदार नसतानाही ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. राजकीय पक्षाला चार राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. जर सहा टक्क्यांहून कमी मते असतील तर किमान तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी होणे आवश्यक आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. तर, गोवा विधानसभा निवडणुकीत 6 टक्के मते मिळवली. तर, गुजरातमध्ये 12.92 टक्के मिळवली. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू हे संपूर्ण देशभरात कायम राहू शकते. या निवडणूक चिन्हावर इतर दावा करू शकणार नाहीत. याशिवाय इतरही काही महत्वाचे फायदे राष्ट्रीय पक्षांना मिळतात.

टॉर्टिला डे पटाटा आणि सी फूड सिजलर रेसिपी | Tortilla de Patatas & Seafood Sizzler Recipe | Epi 51