भारत भविष्यातील महाशक्ती, व्हाईट हाऊसनं दिली कबुली

0

नवी दिल्लीः भारत हा आमचा मित्रच नाही तर भविष्यातील एक महाशक्ती (India is future Superpower) असल्याची कबुली अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय. अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते मागील २० वर्षांपासून भारत आणि अमेरिकेतेचे संबंध जेवढ्या गतीने मजबूत होत झाले आहेत, ते तेवढे इतर देशांसोबत झालेले नाहीत. भारत एक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असल्याचे मतही या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. ‘ऐस्पन सेक्युरिटी फोरम’ने आयोजित केलेल्या बैठकीत भारताशी संबंधित चर्चा झाली. यामध्ये व्हाईट हाऊसच्या एशिया धोरणाचे समन्वयक कॅम्पबेल यांनी ही कबुली दिली आहे.


अमेरिकेसाठी भारतासोबतचे द्विपक्षिय संबंध महत्त्वाचे आहेत. एक वस्तुस्थिती अशी आहे की, मागच्या २० वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेमध्ये जे संबंध प्रस्थापित झाले ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. ते गतीने मजबूत होत गेले. अमेरिकेला आपली क्षमता आणखी अंमलात आणण्याची गरज आहे. तंत्रज्ञान आणि अन्य मुद्द्यांवर एकसोबत काम करत असताना लोकांमध्ये काम करण्याची गरज आहे. भारत हा अमेरिकेचा एक सहकारी होणार नाही तर तो एक स्वतंत्र, शक्तिशाली देश बनण्याची तयारीत आहे. एक महाशक्ती म्हणून भारत पुढे येऊ पाहात आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.