बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे विरोध करणार नाही

0

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यास (MNS President Raj Thackeray) भाजपचे खासदार व भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांची भूमिका कारणीभूत ठरली होती. आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह यांना आमंत्रित करण्यात आले असतानाच बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही, असे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. पुण्यातील मनसेचे नतेे वसंत मोरे यांच्याकडून हे स्पष्टीकरण आले आहे. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करु नका, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले असल्याचे मोरे यांनी सांगितले.


जून महिन्यात राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. मात्र, बृजभूषणसिंह यांनी त्यांना पाय ठेवू देणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना तो दौरा रद्द करावा लागला होता. राज ठाकरे आयोध्येला जाऊ शकले नव्हते. त्यावेळी बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. मनसेने त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता बृजभूषणसिंह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मनसेच्या भूमिकेवर लक्ष लागले होते. मनसेने आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध न करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले असल्याने त्यांना आम्ही पुण्यात प्रवेश देणार आहोत, असे वसंत मोरे यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणे पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. ते काम आम्ही करत आहोत. राज ठाकरेंनी जर आदेश दिले नसले तर बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असेही मोरे म्हणाले आहेत.

टॉर्टिला डे पटाटा आणि सी फूड सिजलर रेसिपी | Tortilla de Patatas & Seafood Sizzler Recipe | Epi 51

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा