मुंबईः टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या अपघाताच्या वेळी डॉ. अनाहिता पंडोळे या कार चालवित होता व त्यांचा निष्काळजीपणाच अपघातास कारणीभूत ठरल्याचे पोलिसांच्या तपासात यापूर्वीच आढळून आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पंडोळे यांनी यापूर्वी अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांना प्रचंड वेगाने गाडी चालविल्याबद्धल अनेकदा दंडही भरावा लागला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. अनाहिता पंडोळे यांच्यावर किमान सातवेळा ओव्हरस्पीडींग बद्धल कारवाई झाली असल्याचे (Cyrus Mistry Accident Case investgation) आढळून आले. त्या व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. पालघर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असून त्यात या धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. डॉ. पंडोळे यांच्याविरुद्ध वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (वय 54) आणि त्यांचे मित्र जहांगीर पांडोळे यांचा या वर्षी 4 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या पुलावर मर्सिडीज बेंझ कार रेलिंगला धडकल्याने मृत्यू झाला. या घटनेत कार चालविणाऱ्या डॉ. अनाहिता आणि तिचा पती डेरियस गंभीर जखमी झाले होते ते सर्वजण अहमदाबादहून मुंबईला परतत होते. पालघर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली की, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अनाहिता पंडोळे यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या होर्डींग्जचा त्रास व्हायचा. त्या बद्धल त्यांनी तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र, वेगाने गाडी चालविण्याची सवय त्यांनी सोडली नाही. 2020 पासून आतापर्यंत बर्याच वेळा त्यांना वेगाने गाडी चालवल्याबद्दल दंड भरावा लागला आहे. त्यांच्याविरुद्ध जारी केलेली ई-चलान आता आरोपपत्रात समाविष्ट केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.