नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे रविवार, 18 डिसेंबरला नागपूर येथे येत आहेत. सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
दुपारी 3 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने कुटीर क्रमांक 9, रवी भवनकडे प्रयाण करतील. त्यानंतर रवीभवन येथून मोटारीने विधानभवनकडे प्रयाण करतील.
दुपारी 4 वाजता हिवाळी अधिवेशनासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर विधानभवन परिसराची पाहणी करतील. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती, उपाध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सुयोग पत्रकारांचे निवासस्थान व आमदार निवास येथे सदिच्छा भेट देतील. आमदार निवास येथून मोटारीने शासकीय निवासस्थान कुटीर क्रमांक 9, रवी भवनकडे प्रयाण करतील.