कृषी उत्पन्न बाजार समिती,भीषण आगीत दोन दुकाने जळून खाक

0

 

(Amravti)अमरावती– अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला विभागामध्ये आज दुपारच्या वेळेस अचानक आग लागल्यामुळे समितीत धावपळ झाली. दोन दुकानातून आगीचे डोंब बाहेर येत असल्याचे पाहून तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. काही क्षणात 4 अग्निशमनचे वाहन दाखल झाले. ते दुकान होलसेल भाजीपाला एजंट असलेले दीपक गुल्हाने आणि विलास राजगुरे यांच्या दुकानात आग लागून आतील लसूण कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून काहीच वेळात आगीवर नियंत्रण आणले.