Home Top News “अजित आमच्याच पक्षाचे नेते”, शरद पवारांची पुन्हा गुगली!

“अजित आमच्याच पक्षाचे नेते”, शरद पवारांची पुन्हा गुगली!

0

मुंबई MUMBAI -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  SHRAD PAWAR शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण केला आहे. (NCP President Sharad Pawar) “सुप्रिया सुळे, अजित पवार AJIT PAWAR आमच्याच पक्षाचे नेते असून त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही”, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. शरद पवारांचा अजित पवारांचा छूपा पाठिंबा असल्याचे या निमित्ताने दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांनी देखील याच स्वरुपाचे वक्तव्य केले होते. आता त्यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनीही मत व्यक्त केले आहे. वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणण्याचे काही कारण नाही, हा त्यांचा निर्णय आहे, असे देखील शरद पवार म्हणाले. बीडमधील सभेनंतर आज त्यांची कोल्हापूर येथे जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेमध्ये ते काय बोलतात या कडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपसोबत सत्तेत सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलाही संभ्रम नसल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या होत्या.