थर्टी फर्स्टच्या सोहळ्यासाठी सारेच सज्ज

0

बंदोबस्तासाठी २५०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची तैनात; अक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

नागपूर. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज (whole world is ready to welcome the new year ) झाले आहे. विशेषतः तरूणाईची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. हॉटेल, पब, बार अशा सर्वच ठिकाणी नववर्षाच्या जल्लोषाची विशेष व्यवस्था केल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी अप्रिय घटना टाळण्यासाठी नागपूर पोलिसांनीही (Nagpur Police) कंबर कसली आहे. सर्वत्र कडक बंदोबस्त आणि करडी नजर (Strict security and watchful eye everywhere) युवकांच्या उत्सवावर असल्यामुळे तरूणाईचा काहीसा हिरमोड होणार आहे. मद्यपींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून गोंधळ घालणाऱ्यांची रात्र पोलिस ठाण्यात जाणार असल्याचे निश्चित आहे. वाहतूक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि विशेष पथक पोलिसही पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा देतील. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पार्टी साजरी करून घराकडे परतणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्थेसाठी जवळपास २५०० पोलिस अधिकारी-कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. थर्टी फर्स्टसाठी शहरातील मोठमोठे हॉटेल्स, लॉन्स, खानावळी, ढाबे आणि सभागृह सजले आहेत. युवकांना आकर्षित करण्यासाठी फेसबूक, वॉट्सऍप, मेल आणि अन्य माध्यमांनी पार्ट्यांबाबत संदेश पोहचविण्यात आले. यासोबत नाईट क्लब, बॅश, फ्लोअर डान्स, बारही सज्ज झाले आहेत.

रस्त्यावर गोंधळ घालणारे आणि सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ३२ गस्त वाहनांसह १२० चार्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने ७०० पोलीस कर्मचारी मंगळवारपासूनच तैनात केले आहेत. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना दंडासह रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार आहे. अंबाझरी, सिव्हिल लाइन्स, शंकरनगर, धरमपेठ, फुटाळा तलाव, वर्धमाननगर, मेडिकल चौक, अजनीत पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात येतील. त्यांच्याकडे ‘स्पीड गन व ब्रीथ ऍनालायझर‘ राहणार असून दंडात्मक कारवाईऐवजी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांची खासगी पार्ट्यांवरही नजर असणार आहे. त्यामुळे कुणालाही परवानगीशिवाय लाऊडस्पिकर वाजविता येणार नाही. खुल्या जागेवर पार्टीचे आयोजन करीत असताल तर लाऊडस्पिकर रात्री बारा वाजता बंद करावा लागणार आहे. अन्यथा लाऊडस्पिकर जप्त करून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे

शंखनाद खाद्ययात्रा | Ep.65 रस्टी फ्रेंच अनियन सूप आणि स्पिनच अँड चीज किष Recipe