एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस

0

पुलाच्या बांधकामावरील वाहने जाळली ; परिसरात दहशतीचे वातावरण

गडचिरोली. जगभरात थर्टी फर्स्टची धूम सुरू झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्राच्या (Maharashtra ) टोकावर असलेल्या गडचिरोलीच्या (Gadchiroli ) एटापल्ली (Etapalli) तालुक्यातून चिंता वाढविणारी बातमी समोर येत आहे. गेले काही दिवस शांत असणाऱ्या नक्षलवाद्यांनी नागपुरात सुरू असलेले हिवाळी अधिवेशन आटोपताच गट्टा ते गट्टागुडा मार्गावर पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी विध्वंस घडवून आणत वाहनांची जाळपोळ केली. या घटनेमुळे त्या भागात दहशतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. काही काळ शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात जाळपोळ केली. शनीवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.


गट्टा ते गट्टागुडा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या वाहनांची नक्षल्यांनी रात्री १०च्या सुमारास जाळपोळ केली. यात मिक्सर मशीनचा समावेश आहे, तर काही वाहनांची तोडफोड केली. दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या. परंतु, महिनाभरापासून नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून प्रशासनाला धमकी देण्यासाठी पत्रकबाजीसारखे प्रकार दिसून येत आहे त्यामुळे पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकस घराबाहेर पडण्यास घबरत असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीच नक्षलवाद्यांमुळे गडचिरोलीचा विशास थांबू देणार नाही. नक्षल्यांचा विमोड करून विकासाला चालना दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला होता. गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने मोठा स्टिल प्रकल्प सुरू करण्याची ग्वाहीसुद्धा दिली. पण, अधिवेशन आटोपताच नक्षलवाद्यांनी त्यांच्या कारवायांना सुरूवात करीत आपले मनसुबेही दाखवून दिले.

शंखनाद खाद्ययात्रा | Ep.65 रस्टी फ्रेंच अनियन सूप आणि स्पिनच अँड चीज किष Recipe