मुंबई : आज राज्याच्या राजकारणात फार मोठी घडामोड झाली आहे.
याकडे मी सकारात्मकपणे बघत आहे.
मागील एक वर्ष जे लोक आम्हाला गद्दार, खोके म्हणत होते ते सगळे आरोप आता धुवुन निघाले आहेत.
आज स्वत: अजित पवार यांनी सरकारसोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अजित पवार यांच्यासारखा अनुभवी असलेला नेता महायुतीमध्ये सामील होत आहे. महाराष्ट्राच्या विकासाची संकल्पना आम्ही पुर्ण करु.
भविष्यात तिघांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करु.
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत राहुल कनाल यांचा पक्षप्रवेश
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी व नागरी विकास कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आदित्य ठाकरे यांचे युवासेनेतील सहकारी राहूल कनाल आणि कॉंग्रेस पक्षाचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर ८ नगरसेवक यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जल्लोषात प्रवेश केले.