बुलढाणा – खामगांव तालुक्यातील चिंचपूर येथे शेतीच्या वादातून अंगावर मिरची पावडर टाकून पाच जणांनी लाठ्या-काठ्या, चाकूने मारहाण करुन दोन युवकांची हत्या केली. दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली. सय्यद मुख्तार सय्यद सैदू, सय्यद मुस्ताक सय्यद मुक्तार, सय्यद सलमान सय्यद मुक्तार , सय्यद राजू सय्यद रज्जाक सर्व रा चिचपुर ता. खामगाव, कलीम खाँ सत्तार खाँ, रशीद खान संत्तार खाँ, बशीर खाँ, सत्तार खाँ, शकीरा बी कलीम खाँ,समीना बी अमीन खाँ. रा मेहकर व ईतर २ ते ३ अश्या एकूण १२ जणांनी शेतीच्या वादातून मोहम्मद खाँ तूराब खाँ. शेख कासम शेख जान मोहम्मद, शरीफाबी तुराबखाँ, शकीलाबी अल्यारखाँ रा. चिंचपूर यांच्या अंगावर मिरची पावडर फेकून लाठ्या-काठ्यांनी व चाकूने मारहाण करून मोहम्मद खाँ तुराब खाँ, शेख कासम शेख जान मोहम्मद यांची हत्या केली. सदर प्रकरणी शेख जावेद खान अल्यार खाँ, रा. चिंचपूर यांनी हिवरखेड पोस्टेला दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांविरूद्ध कलम ३०२, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १२० गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ आरोपींना अटक करण्यात आले असून आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या शेतीत पेरणीचा हंगाम असल्याने शेतीचे वाद उद्भवण्याची शक्यता असल्याने शेतीच्या वादातून टोकाची भूमिका न घेता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचे विचार करून जातीय सलोखा व सामाजिक दृष्टीकोन बाळगून शेतीच्या वादाबाबत कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा. जेणेकरून कोणतीही जिवीतहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलसांनी केले आहे.