भोपाळ : लग्न समारंभांमध्ये काय काय प्रकार घडतील, याचा अंदाज अद्याप कोणालाही लावता आलेला नाही. अलिकडेच मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे काहीशी विचित्र वाटणारी घटना घडली असून ब्युटीशियनने मेकप बिघडविल्यावर वधु किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याची परिणती या घटनेतून आली आहे. ब्युटीशियनने (Police complaint against Beautician) केलेला मेकप आवडला नाही म्हणून मोठा वाद झाला व प्रकर वेगळ्या थरावर गेले. नववधूने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची घटना घडली. ब्युटी पार्लरच्या मालकीणीने नवरीलाच शिवीगाळ केली. यानंतर नववधूने थेट पोलिसांतच धाव घेत ब्युटी पार्लरच्या मालकीणीच्या विरोधातच तक्रार दाखल केली आहे.
जबलपूर येथील एक नववधू लग्नाच्या दिवशी मेकअपसाठी एका ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. नवरीच्या मेकअपसाठी साडेतीन हजार रुपयांचे मानधन ठरले होते. यावेळी ब्युटिशयनने तिचा मेकअप चांगला केला नाही. तिने मेकअप बिघडवला, असा नवरीचा समज झाला. नवरीने मेकअप आवडला नसल्याची तक्रार ब्युटी पार्लरच्या मालकीणीकडे केली. पण, पार्लरच्या मालकीणीला ही तक्रार मान्य नव्हती. मेकप व्यवस्थितच झाला असल्याचा दावा मालकिणीने केला. त्यातून वाद वाढला व या वादात ब्युटी पार्लरच्या मालकिणीने वधूलाच शिवीगाळ केली. त्यामुळे वाद आणखीनच चिघळला. या घटनेनंतर नववधूने ब्युटी पार्लर चालक महिलेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मेकप न आवडल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती आहे.