
- राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस जिंकू शकत नाही
नागपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेला विजय ऐतिहासिक असून विरोधकांचे डोळे उघडणारा आहे. गुजरातच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक राजकारणाला पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या निकालाच्या पार्शवभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. गुजरातमध्ये प्रवास करताना भाजपाचा मोठा विजय होणार असल्याचे आपण पूर्वीच बोललो. राहुल गांधी कधीही देशात काँग्रेसचे नेते म्हणून पुढे येऊ शकत नाही. काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वात विजय मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.
आपने खूप मोठ्या मोठ्या घोषणा केल्या मात्र त्यांना यश मिळाले नाही. मिळताना दिसत नाही. राहुल गांधी यांचा प्रभाव दिसत नाही त्यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्यांच्याकडे विजन नाही. गुजरातमध्ये पराभव होईल हे त्यांना माहित असल्यानेच त्यांनी गुजरातमध्ये प्रचार केला नाही असाही टोला लगावला.
संजय राऊत यांनी विधायक कामे करावीत
संजय राऊत यांना धमकीचे फोन आले असेल, तर त्यांनी पोलिसांचे संरक्षण मागावे. पोलिसात तक्रार करावी. मात्र ते मीडियासमोर येऊन बोलत आहेत. त्यांनी संरक्षण मागितले तर देवेंद्र फडणवीस संरक्षण देण्यात सक्षम आहे. ते रोज नेत्यांना शिव्या शाप देतात. राऊत यांनी प्रकारचे बोलणे टाळावे. ते तीन महिने जेलमध्ये राहून आले आहेत. कैद्यांची जशी भाषा असते तशीच भाषा ते वापरतात. आता संजय राऊत यांनी विधायक काम करण्याचा सबुरीचा सल्लाही बावनकुळे यांनी यावेळी दिला.
Related posts:
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा ६ जून रोजी पुण्यात
June 6, 2026Artical Blog

















