नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर तसेच ग्रामीणतर्फे (जिल्हा) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे २१ महिन्यांनतर स्वगृही नागपूरात आले असता शनिवार ११ फेब्रुवरी रोजी भव्य रॅलीने फुलांनी सजविलेल्या जीपवर स्वार होत जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले घरी पोहचण्यासाठी त्यांना दोन अडीच तास लागले. चार जेसीबीच्या सहाय्याने निवासस्थानी आल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली.
4 वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत झाले. वर्धा रोडवरील साई मंदिरात दर्शन व आर्शीवादाचा कार्यक्रम झाल्यानंतर ,व्हेरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण,आदिवासी गोवारी समाज चौक येथे स्मारकाला भेट,संविधान चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण व मानवंदना दिल्यानंतर रॅलीचा समारोप अनिल देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी झाला.
रॅली दरम्यान चौका-चौकात स्वागत मंच उभारले गेले. लाडू वितरण,पुष्पवृष्टी व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. बँड व ढोल ताश्यांच्या गजरात ठिकठिकाणी अनिल देशमुखांचे नागपूर शहरात जंगी स्वागत करण्यात आले. संघर्ष योद्धा, साहेब तुम्ही डगमगले नाहीत, आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवले,…असे अनेक फलक रस्त्याने लागले होते.
याप्रसंगी एका पत्रकाचे देखील वाटप करण्यात आले.यात परमबिर सिंग यांनी केलेल्या आरोपापासून तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाचा दिलासापर्यंतचा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज(बाबा)गुजर,प्रवीण कुंटे-पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते शेखर सावरबांधे,आभा पांडे,रमण ठवकर, नूतन रेवतकर,जानबा मस्के,श्रीकांत घोगरे,लक्ष्मी सावरकर,संतोष सिंह,शैलेंद्र तिवारी,आशिष लाड आदीसह काटोल, नरखेड परिसरातून आलेले समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
अनिल देशमुख यांचे रॅलीने ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा