अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगितीत वाढ, कारागृहातील मुक्काम वाढला

0

नागपूर : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावरील स्थगिती उच्च न्यायालयाने वाढवली असून न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य केली आहे. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (Money Laundering Case) स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर रोजी देशमुखांचा जामीन मंजूर केला होता. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे २२ डिसेंबरपर्यंत जामीनाला स्थगिती दिलीहोती. आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


सर्वोच्च न्यायालयात सुट्या आहेत. सुटीकाळातील न्यायालयात उपलब्ध नसल्यामुळे देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती 3 जानेवारीपर्यंत वाढवण्याची विनंती सीबीआयकडून करण्यात आली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना काल मनी लाँड्रिंग प्रकरणात ( money laundering case) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दोन लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर पालांडे यांना जामीन मंजूर केलाय. मात्र, अनिल देशमुखांप्रमाणेच सीबीआयच्या केसमध्येही पलांडे यांना अटक असल्याने तूर्तास त्यांचीही कारागृहातून सुटका होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा