
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी ही विरोधकांनी जोरदार घषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध केला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, ईडी सरकार हायहाय या मागण्यांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला.
बोम्मई सरकार हायहाय, कर्नाटक सरकारचा निषेध असो, राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ अशा घोषणा देऊन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुनील राऊत, भास्कर जाधव, विकास ठाकरे, हसन मुश्रीफ आदि सहभागी होते.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog

















