नागपूर Nagpur : उपराष्ट्रपती जगदीप धनखड Jagdeep Dhankhad यांचे शुक्रवारी ४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता नागपुरात आगमन झाले. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. उपराष्ट्रपती एक दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला आले आहेत.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्ग, मेजर जनरल एस. के. विद्यार्थी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, आदींनी स्वागत केले. उपराष्ट्रपतींसोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुदेश धनखड यांचेही आगमन झाले.
दुपारी 3.30 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी 5.30 वाजता ते राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. एनएडीटीमध्ये सायंकाळी 5.30 नंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या या प्रबोधिनीमध्ये ते जवळपास तीन तास असतील. रात्री 9.20 वाजता ते दिल्लीकडे प्रयाण करतील. सुमारे सहा तास उपराष्ट्रपती नागपूरात असणार आहेत.