
निमित्ताने त्रुटी पुर्तता शिबिराचे आयोजन
नागपूर(Nagpur): उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक युग पुरुष व आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते.ते एक विद्वान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ,समाजसुधारक, आणि द्रष्टे नेते होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानात लोकशाही,स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता,आणि बंधुता या मुल्यांच्या आधारे आधुनिक भारताच्या विकासाचा पाया रचला आहे.भारतीय संविधानाच्या उशिकेनुसार सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय निश्चितपणे प्राप्त करुन देण्याची जबाबदारी शासनाची आहे.राज्य घटनेच्या कलम ४६ मध्ये “राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील
आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासुन त्यांचे संरक्षण करेल”. असे नमूद करण्यात आले आहे.वरील निर्देशांचे अनुषंगाने अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पिडित शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे.त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत
आहेत.
राज्यात “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ” सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रं.सान्यावि-२०२५/प्र.क्र. २७/बांधकामे मंत्रालय, मुंबई दिनांक ३०मार्च २०२६ अन्वये दि.८ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,नागपुर मार्फत सामाजिक न्याय समता सप्ताह निमित्ताने दि.८ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत त्रुटी पुर्तते सबंधात विशेष त्रुटी पुर्तता शिबीराचे आयोजन केले आहे.या शिबीरामध्ये शैक्षणिक/ निवडणुक /सेवा शाखेतील ज्या अर्जदारांनी या कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी करीता अर्ज सादर केले असुन अशा अर्जदांराना त्रुटीचा ई-मेल, एस.एम.एस. किंवा फोन आला असेल अशा सर्व पालक, विद्यार्थ्यांनी ११ ते ४ यावेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपुर कार्यालयात भेट देवुन त्रुटीची पुर्तता करावी. करीता सदर कालावधीमध्ये संपर्क साधुन विशेष मोहीमेचा लाभ घेण्याचे आव्हाण उपायुक्त तथा सदस्य,डॉ.मंगेश वानखडे, जिल्हा जात पडताळणी समिती नागपूर यांनी केले आहे.




















