
(Buldhana)बुलढाणा – राज्यातील बहुजन शेतकरी भूमिहीन प्रकल्पग्रस्त कामगार शेती मजुरांच्या निवासी घराचे कायम पट्टे व रमाई घरकुल अनुदान अडीच लाख रुपये करण्यात यावे, शेतकरी कर्जमुक्ती देण्यात यावी, जिगाव व पेनटाकळी प्रकल्पग्रस्त अतिक्रमण पट्टी धारक शेतकऱ्यांच्या बेकायदेशीर पिके व घरे उद्ध्वस्त केलेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन व पर्यायी जमीन किंवा मोबदला देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यापूर्वीच 31 जानेवारी रोजी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला होता.
मात्र, थंडीचे दिवस असल्यामुळे हा मोर्चा आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यामार्फत यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास 20 फेब्रुवारीला मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाई प्रदीप अंभोरे यांनी दिला आहे.