
(Akola)अकोला– वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अध्यक्ष (Prakash Ambedkar)प्रकाश आंबेडकर यांनी आज याबाबत धक्कादायक वक्तव्य केले. अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचे असेल तर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली पाहिजे. हायकमांडने तशी मान्यता दिली आहे की नाही, हे अद्याप आम्हाला माहिती नाही, असे आंबेडकर म्हणाले.
मंगळवारी (३० जानेवारी) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितला मविआत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आता आंबेडकरांनी वेगळाच दावा केलाय. यासंदर्भातील पत्रकावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Shiv Sena’s Thackeray faction MP Sanjay Raut)शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि (State president of Sharad Pawar group of NCP Jayant Patil) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. परंतु, वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकर म्हणाले, (Congress state president Nana Patole)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्याशी पत्रव्यवहार करतात. परंतु, वंचितच्या मविआतील समावेशाबाबतचा निर्णय (Congress leader Ashok Chavan)काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि (Balasaheb Thorat)बाळासाहेब थोरात घेतली, असे आम्हाला समजले आहे. मात्र, सध्या मिळालेल्या पत्रावर केवळ नाना पटोले यांची सही आहे, असे त्यांनी सांगितले.