नागपूर (Nagpur) :- १९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला तो आजचा दिवस!(28 फेब्रुवरी).
दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. ‘गणू म्हणे’ ही त्यांची नाममुद्रा.गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज हे मराठी संत, कवी, कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे महीपती’ म्हणून ओळखतात. महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता.
श्रीगजाननविजय– शेगावच्या श्रीगजानन महाराजांच्या लीलाचरित्र वर्णन असलेला ग्रंथ जो महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे,श्री गुरूचरित्र साराम्रूत, श्रीनागझरी महात्म्य, श्रीविष्णुसहस्रनामबोधिनी, श्रीशंकराचार्य चरित्र व इत्यादी.
*आरती रचना:
“शिर्डी माझे पंढरपूर”, ‘साई रहम नजर करना’,साई स्तवनमंजिरी,”जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया”, श्री गजानन महाराज अष्टक ही काही प्रमुख रचना.तसेच दासगणू महाराज आणि श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे पण फार जवळचे संबंध होते .अनेक संतांचे आशीर्वाद त्यांना लाभले.अशा महत कल्याण कारी व जगाला वरदायी झालेलं दासगणु महाराजांचे जीवन आपल्या सामान्य लोकांसाठी अमृत आहे. म्हणूनच आजच्या पावन दिवशी त्यांचे स्मरण करणे महत्त्वाचे!..