फडणवीस म्हणाले; “ना जात पर ना पात पर, काम होगा विकास पर”

0

चंद्रपूर (Chandrapur ) | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार प्रचारार्थ वणी येथे आयोजित जाहीर सभेस महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी “ना जात पर ना पात पर, काम होगा विकास पर” असे जनतेला आवाहन केले. आजवर केलेल्या विकास कामांची उजळणी करत या लोकसभा क्षेत्राची सेवा करण्याची संधी देण्यासाठी जनतेकडे मतरुपी आशीर्वाद मागितला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र जी फडणवीस यांच्यासह भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रताई वाघ, आमदार श्री.संजीव रेड्डी बोदकुरवार, संदीप धुर्वे, अशोक उईके आणि महायुती मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. (#BJP #AbkiBaar400Paar #LokSabhaElection2024)

जमलेल्या विशाल जनसमुदायाची उपस्थिती पाहता माझ्या मनात कोणतीही शंका नाही की, वणी मतदारसंघातून सुधीरभाऊंना सर्वाधिक लीड मिळेल. गेल्या 25 वर्षांपासून मी सुधीरभाऊंसोबत काम करत आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा घेतली तर सुधीरभाऊ सर्व गोल्ड मेडल नक्कीच जिंकतील. त्यामुळे असा नेता वणी मतदारसंघाच्या आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधांवर ₹ 1 लाख कोटी खर्च करण्यात येत होते. मात्र मोदी सरकारच्या काळात हे बजेट ₹ 13 लाख कोटींपर्यंत वाढवून 13 पटीने यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळेच देशात मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. त्यासोबतच मोदी सरकारने ओबीसी समाज आणि बारा बलुतेदारांकरिता ₹ 20,000 कोटींची योजना आणून पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना अर्थपुरवठा करून त्यांच्या पुढील पिढ्यांना रोजगार मिळण्याची व्यवस्था निर्माण केली आहे.

भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी यवतमाळच्या जनतेने सुधीरभाऊंना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा