खासदार संजय राऊत यांनी डागली तोफ
मुंबई. औरंगाबादचे नामांरण (Naming of Aurangabad) करण्याची हिंमत भारतीय जनता पक्षाकडे (BJP) नाही, अशी तोफ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी डागली आहे. पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना भाजपाचे नेते ‘हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून दाखवा, अशी गर्जना करत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. याचे कारण काय? औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धारशीव करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मात्र भाजप आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. उस्मानाबाद शहराचे नामकरण धाराशीव करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. केंद्र सरकारनेच ही बाब स्पष्ट केली आहे. त्यावर राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली.
भाजपाचे नेते नेमके कोणाला घाबरत आहेत. यावर निर्णय न घ्यायला कोणता कायदा आडवा येतो आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे? मुळात भाजपाचे लोक ढोंगी आहे. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केले. मात्र, औरंगाबादचे नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असेही राऊत म्हणाले.
राज्य सरकारवरही निशाणा
राऊत यांनी आसाम सरकारच्या जाहिरातीवरूनही टीका केली. ते म्हणाले, आसामचे मुख्यमंत्री अशी जाहीरात देत असेल तर आपले सरकार या करत आहे? राज्याचे मुख्यमंत्री खोके घेऊन आसाममध्ये पाहुणे बनून गेले होते. त्याबदल्यात आसामला ज्योतिर्लिंग दिले का? हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांच्या या टीकेनंतर आता नामांतरणाचा विषय पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तुर्त राज्यातील सत्तापक्षाकडून अद्याप या विषयावर प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.