कसबा काबिज करण्यासाठी भाजपची ‘मोर्चेबांधणी’

0

अनेकांच्या भेटीगाठी : बालन यांच्यासोबत भेटीची सर्वत्र चर्चा

पुणे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Assembly by-elections ) निमित्ताने पुणे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. कसबा मतदारसंघ (Kasba Constituency ) राखण्यासाठी भाजपकडून मोर्चेबंधणी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) स्वतः मैदानात उतरले आहेत. अलीकडेच त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर तब्बल ३ तास अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांचाही समावेश होता. बालन यांच्यासोबतच्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. सावरकर स्मारक समितीच्या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस बुधवारी सायंकाळी पुण्यात आले होते. बैठकीनंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या घरी गणेश उत्सव मंडळांचे आधारस्तंभ पुनीत बालन यांची भेट घेतली. सुमारे २० मिनिटे प्रदीर्घ चर्चा झाली.

कसबा मतदारसंघातील दीडशेहून अधिक गणेश मंडळांना पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत करण्यात आली होती. या मदतीमुळे कोरोनाच्या साथीनंतरचा गणेशोत्सव मंडळांना चांगल्या पद्धतीने साजरा करता येऊ शकले होता. यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते बालन यांच्याशी व्यक्तीशी जोडली गेलेली आहेत. याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि बालन यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे. बालन यांच्याकडून मात्र याविषयावर कुठलीच प्रतिक्रिया अद्याप आली नाही.

दगाफटका टाळण्याचे प्रयत्न
कसब्यात विजयासाठी फडणवीस स्वतः मोर्चेबांधणी करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून कसबा मतदारसंघातील महत्त्वाच्या असलेल्या सराफ असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. फत्तेचंद्र रांका यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची रात्री उशिरा बैठक घेतली. जवळपास ३ तास देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. एकीकडे विजयासाठी आवश्यक गोळाबेरीज करायची, त्याचवेळी दगाफटका टाळणे अशा दोन्ही मोर्चांवर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे या भेटींवरून लक्षात येते. माविआ आणि भाजप उमेदवारात थेट लढत असल्याचे चित्र या मतदार संघात दिसत आहे.

 

 

संत्र्याची खीर आणि स्वीट कॉर्न साटोळी EP No-85|Orange kheer recipe|Sweet Corn Recipe|shankhnaad news