धाराशिव – तेलंगणाचे मुख्यमंत्री( CHANDRASHEKAR RAO)चंद्रशेखर राव यांनी शेतकरी हिताचे धोरण राज्यात राबवत ते महाराष्ट्रातही अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राय यांचा (BRS)बीआरएस मराठवाड्यापासून महाराष्ट्रात पाय पसरत आहे. (NANDED)नांदेडच्या सभेनंतर २४ एप्रिलला छत्रपती (SAMBHAJI NAGAR)संभाजीनगर येथे चंद्रशेखर राव यांची सभा होणार आहे. भविष्यात पुर्ण (MAHARASHTRA)महाराष्ट्रात सभा होतील व राज्यात आगामी सर्व निवडणुका बीआरएस ताकदीने स्वबळावर लढवेल, अशी माहिती बीआरएसचे राज्य समन्वयक माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बीआरएसची ध्येय, धोरणे व आगामी रणनिती यावर त्यांनी प्रखर भाष्य केले. शरद जोशी यांची शेतकरी संघटना ८० टक्के बीआरएस झाल्याचे सांगितले. मात्र, नुकताच पक्षप्रवेश केलेले (FARMER)शेतकरी संघटनेचे (MARATHAWADA)मराठवाडा अध्यक्ष रामजिवण बोंदर यांनी संघटना विलीन न करता केवळ शेतकरी हिताच्या धोरणामुळे सोबत असल्याचे सांगितले. मात्र कर्नाटक सरकारही शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे. यावर बोलण्यास नकार देत ५० टक्के शेतकरी संघटनेसोबत असल्याचे सांगितले. यावरून भविष्यात शेतकरी संघटना कितपत राहील याविषयी चर्चा होत आहे.