जयेश पुजारीचे लष्कर-ए-तैयबा, पीएफआयशी संबंध

0

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणीसाठी फोन करणारा जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहिर (Jayesh Pujari links with Dawood Gang) याने दाऊद गँग, अल-कायदा, पीएफआय आणि लष्कर- ए- तोएबाकडून आसाममध्ये शस्त्र व बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे त्याच्यावर युएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयेश पुजारी हा दाऊद टोळीच्या तसेच पीएफआय सदस्यांच्या संपर्कात होता, असेही निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जानेवारी व मार्च महिन्यात गडकरी यांच्या कार्यालयात फोन रून खंडणी मागणाऱ्या जयेशला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून अटक करून नागपुरात आणले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण दारुद टोळीचे सदस्य असल्याचा दावाही जयेशने केला आहे. त्याच्याकडे कारागृहात एक डायरी सापडली असून त्यात अनेक महत्वाचे फोन नंबर आढळून आल्याने आता कर्नाटक पोलिसही त्याचा स्वतंत्रपणे तपास करीत आहेत. बेळगाव कारागृहात जयेशला पैसे देऊन स्मार्टफोन वापरायला मिळत होता

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110