प्रत्येक विद्यार्थी सायबर योद्धा व्हावा -राज्यपाल

0

नागपूर. सायबर गुन्हे आज सर्वात गंभीर समस्या ठरली आहे. विद्यार्थी मनोरंजन व गेमींगसाठी मोबाईल, टॅब यासरख्या इलेक्टॉनिक गॅजेटचा वापर करतात. त्यांची हाताळणी सायबर गुन्ह्यांच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जागृतीती गरज आहे. विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या जागृतीसाठी कार्यशाळा घ्याव्या. प्रत्येक विद्यार्थ्याने सायबर योद्धा होऊन या समस्येला तोंड द्यावे, असे आवाहन राज्यापाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 110 वा दीक्षान्त सोहळा गुरुवारी वंसतराव देशपांडे सभागृहात पार पडला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष टी. जी. सीताराम, कुलगुरू सुभाष चौधरी आणि प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते. यंदा शुभांगी परांजपे यांनी ‘दत्तोपासक प.श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज यांच्या वाड्.मय सृष्टी व जीवन दृष्टीचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंधासाठी एकमेव डी.लीट. (मानवविज्ञान पंडित पदवी) प्रदान करण्यात आली.

राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले की, ज्ञान धन आहे. ते धनातील सर्व रूपांमध्ये सर्वक्षेष्ठ आहे. ज्ञान कुणी चोरू शकत नाही, राजा ते जप्त करू शकत नाही. भावांमध्ये विभजित करता येत नाही. ते कुठे घेऊन जाणेही भार सोपे आहे. ते जितके खर्च कराल अधिक वाढत जाईल. शिक्षण व्रत, साधना आहे. ज्ञानार्जन धर्म आहे तर, विद्यापीठ तीर्थक्षेत्र आहे. प्रत्येकाने जीवनभर विद्यार्थी राहून ज्ञानार्जन करीत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण आधुनिक शिक्षण युगाचा प्रारंभ ठरेल. संशोधक व प्रोफेशनल्सची पिढी तयार होईल. त्याद्वारे देशाला आपल्या राष्ट्रीय आकांक्षांना अनुरूप विकासाची उंची गाठता येईल. भारत सर्वात तरूण देश आहे. अनेक देश वार्धक्याकडे वळले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यसंपन्न करून जगाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. महाराष्ट्र निश्चितच त्यात मोलाचे योगदान देऊ शकेल. चांगल्या विद्यापीठांसोबत टायप करून घेत कुशल मानव संसाधनाचे पूल तयार करण्याची सूचना त्यांनी विद्यापीठाला केली. आपल्या देशात श्रमाच्या प्रतिष्ठेचा अभाव असल्याची खंत व्यक्त केली. शिक्षित वर्ग छोटे मोठे काम करणाऱ्यांना हिन दृष्टीने पाहतात, या वृत्तीमुळेच अनेक पदवीधर बेरोजगार राहतात. श्रमाच्या प्रतिष्ठेसोबतच उद्यमी व स्टार्ट अपचे निर्माते व्हावे लागेल. विद्यापीठांनी विद्यार्थी केंद्रीत व्हावे. शिक्षक कमी समस्या दूर करण्यासाठी विद्यापीठांना समाधान शोधावे लागेल. आरोग्याच्या सुनिश्चितीसाठी कार्यस्थळी योगाभ्यासावरही लक्ष द्यावे लागेल, अशीही सूचना त्यांनी केली.

सामाजिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधा – सितीराम
भारतीयांनी पिढ्यानपिढ्या पारंपारिक ज्ञानाचा वारसा समृद्ध केला आहे. स्थानिक नागरिक, ग्रामस्थांनी आन्य संस्कृतींकडून देखील ज्ञान आत्मसात केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी देखील आधुनिक आणि पारंपारिक ज्ञान वापरून सामाजिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत, असे आवाहन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष टी. जी. सिताराम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. योग्य व्यक्तींचे उत्कृष्ट योगदान समोर आणणे फार महत्वाचे आहे. डिजिटल युगात नवकल्पनांसह जग झपाट्याने बदलत आहे. त्याचा परिणाम आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. उच्च दर्जाचे शिक्षण, नवोपक्रम, उद्योजकता, संशोधन आणि सामुदायिक संलग्नता केंद्रांसह शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

नंदिनी सोहनीला सर्वाधिक पदके
समारंभात एक लाखावर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. सर्वाधिक 7 सुवर्ण आणि 2 पारितोषिके डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील बीएएलएलबीची विद्यार्थिनी नंदिनी समीर सोहनी हिने पटकावली. डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील एमबीए विषयातील विद्यार्थी विक्की सुधकर पडोळे याला 7 सुवर्णासह सन्मानित करण्यात आले. याशिवाय अनुप्रिया रवींद्रकुमार प्रसाद हिला 5 सुवर्णपदके, आदर्श गिरीपुंजे याला 4 सुवर्णपदके व 1 रौप्यपदक, सोमराज गिरडकर याला 4 सुवर्णपदके व 1 पारितोषिक, राजश्री भोजराज ढबाले हिला 4 सुवर्णपदके व १ पारितोषिक प्रदान करण्यात आले. एकूण 280 संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

 

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110