श्रीराममंदिर प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा ११ जानेवारीला साजरा करा

0

नागपूर (Nagpur) :नागपूर, करोडो तास, लाखो दिवस, असंख्य महिने जवळपास ७६ लढाया, लाखो हिंदूच्या बलिदानानंतर आणि ४९६ वर्षाच्या संघर्षानंतर हिंदू समाजाचा आत्मसन्मान २२ जानेवारी २०२४ ला परत मिळाला.
आयोध्येतील प्रभूश्रीराम मंदिरात देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी पू.सरसंघचालक मोहनजी भागवत आणि हजारो पूजनीय संतमहंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२२ जानेवारी २०२४ ला बालरूपातील रामललाची प्रतिष्ठापना आयोध्येत झाली. भारतासह संपूर्ण जगात जगात जिथे जिथे हिंदु राहतात त्यांनी हा आनंदोत्सव विविध पद्धतीने साजरा केला.
प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेला तिथीप्रमाणे ११ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षी 22 जानेवारीला असणारी तिथी यावर्षी 11 जानेवारीला आहे.म्हणून शनिवार दिनांक ११ जानेवारीला वर्धापनदिनी सर्व हिंदू बंधू-भगिनीनी जवळच्या मंदिरात एकत्र येऊन रामनामाचा जप करावा संकीर्तन करावे आणि सामूहिक आरती करुन प्रसाद वितरीत करावा तसेच सायंकाळी घराच्या बाहेर पाच दिवे लावावेत.

विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

याशिवाय ज्यांना जे जे शक्य असेल त्यांनी विविध पद्धतीने वर्धापन दिनाचा आनंद साजरा करावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र मंत्री श्री गोविंदजी शेंडे आणि मंदिर अर्चक पुरोहित आयामाचे क्षेत्र संपर्कप्रमुख श्री अनिल सांबरे यांनी केले आहे.