सावधगिरी बाळगून सण साजरे करा

0

मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान
दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविवारी मन की बात (Man Ki Baat ) कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधला. मन की बात कार्यक्रमाचा आज प्रसारित झालेला 99 वा भाग ठरला. त्यांनी पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला (Tried to emphasize the importance of organ donation and clean energy). गेले काही दिवस कोरोना संसर्गाचा ग्राफ वाढतो (graph of corona infection is increasing ) आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विषाणूबाबतही त्यांनी जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न केला. सध्या परिवत्र रमजाण महिना सुरू असून त्यासोबतच अनेक सण देखील येत आहेत. यानिमित्ताने त्यांनी देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. सण साजरे करा. पण, नेहमी सतर्क रहा, असा संदेश त्यानी दिला आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे असून तो इशारा असल्याचे मानले जात आहे.

देशाचा काही भागांत कोरोना रुग्ण वाढत आहेत. म्हणूनच सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे, स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. एक महिन्यापूर्वी देशभरात कोविड-19 संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या १०० च्या आत होती, तिथे आता एकापेक्षा जास्त आणि दररोज दीड हजार नवीन रुग्णांची नोंद होत असल्याचे मोदी म्हणाले. भारतात कोरोना विषाणूचे १८९० नवीन रुग्ण आढळले आहेत, जे १४९ दिवसांतील सर्वाधिक आहे. त्यानंतर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ९४३३ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात एकाच दिवसात २२०८ रुग्ण आढळले होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. सोबतच मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सतर्कतेचे आवाहन केले आहे.

अवयवदान वाढत असल्याबद्दाल समाधान

पंतप्रधान मोदी यांनी अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. आज देशात अवयवदानाविषयी जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तीन पटीने वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना रक्तदानासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदान करणाऱ्यांच्या नातेवाइकांचे अनुभव ऐकून घेतले. तुमचा एक निर्णय अनेकांचे जीव वाचवू शकतो, जीवन घडवू शकतो, असेही ते म्हणाले.

 

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा