Home Top News मध्य भारतातील सर्वात मोठ्या ‘गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर’चे २२ मार्चला लोकार्पण

मध्य भारतातील सर्वात मोठ्या ‘गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर’चे २२ मार्चला लोकार्पण

0

सर्वसामान्यांसाठी फाईव्ह स्टार दर्जाच्या वैद्यकीय चाचण्या

नाममात्र दरात उपलब्ध

नागपूरः गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर’चे येत्या रविवारी, २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पावनभूमी, श्रीरामनगर क्रीडांगण, वर्धा रोड, नागपूर या ठिकाणी शानदार लोकार्पण होणार आहे. वर्धा रोडवरील मेट्रो पिलर क्रमांक ८३ च्या समोर उभारण्यात आलेल्या या अद्ययावत केंद्राचे उ‌द्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते पार पडेल.

या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे आणि राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्वप्नपूर्तीचा प्रवास

सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी, देवेंद्र फडणवीस आमदार असताना त्यांनी गोरगरिबांसाठी एका सर्वसोयीयुक्त डायग्नोस्टिक सेंटरचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांच्या या संकल्पनेतून आणि श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या पुढाकारातून हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. दोन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले होते. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत २०,००० चौरस फुटांच्या विस्तीर्ण जागेत ही भव्य इमारत उभी राहिली आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठे डायग्नोस्टिक सेंटर

हे केवळ एक डायग्नोस्टिक सेंटर नसून मध्य भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी वास्तू ठरली आहे. एकाच छताखाली अनेक ‘फाईव्ह स्टार दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात चाचण्या उपलब्ध करणे म्हणजे कोणत्याही, कशाही स्थितीत नव्हेत तर उत्तमच झाल्या पाहिजेत या दृष्टीकोनातून फाईव्ह स्टार दर्जाच्या वास्तूत या चाचण्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक मशिन्सः

या केंद्रात एकाच वेळी दोन ‘३ टेस्ला एमआरआय’ (3 Tesla MRI) आणि दोन ‘१२४ स्लाइस सीटी स्कॅन’ (124 slice CT Scan) मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

सोनोग्राफी आणि पॅथॉलॉजी:

दोन अल्ट्रासाऊंड मशिन्स, डिजिटल एक्स-रे

सर्वात मोठे डायलिसिस युनिटः

अत्याधुनिक मशिन्सः

या केंद्रात एकाच वेळी दोन ‘३ टेस्ला एमआरआय (3 Tesla MRI) आणि दोन ‘१२४ स्लाइस सीटी स्कॅन’ (124 slice CT Scan) मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

सोनोग्राफी आणि पॅथॉलॉजी:

दोन अल्ट्रासाऊंड मशिन्स, डिजिटल एक्स-रे आणि अद्ययावत पॅथॉलॉजी लॅबची सुविधा येथे आहे.

सर्वात मोठे डायलिसिस युनिटः

मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी तब्बल २५ डायलिसिस मशिन्सची व्यवस्था करण्यात आली असून, संसर्गजन्य (Infected) रुग्णांसाठी ५ मशिन्सचा एक स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याशिवाय, विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर मोफत डायलिसिसचीही सोय या केंद्रात केली जाणार आहे.

समाजातील तळागाळातील आणि मध्यमवर्गीय रुग्णांनी गरजेच्या वेळी या अद्ययावत आणि माफक दरातील डायग्नोस्टिक सेंटरचा अवश्य लाभ घ्यावा तसेच या लोकार्पण सोहळयास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांनी केले आहे. त्यांचे समवेत संस्थेचे उपाध्यक्ष श्री अक्षय नाईक, सचिव श्री. पराग सराफ, श्री. रितेश गावंडे, श्री. संदीप बारस्कर, श्री. महेन्द्र भुगांवकर व सौ वासंती देशपांडे उपस्थित होते.