
दुबईतील ओशन मॅन 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
दुबई येथे झालेल्या प्रतिष्ठित ओशन मॅन 2025 आंतरराष्ट्रीय समुद्र पोहण्याच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत चंद्रपूरचे डॉक्टर मंगेश गुलवाडे आणि डॉक्टर कल्पना गुलवाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवून भारताचे तसेच चंद्रपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाने झळकावले.
जगभरातील विविध देशांतील जलतरणपटूंनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेत गुलवाडे दाम्पत्याने ५ किलोमीटर समुद्र पोहण्याच्या आव्हानात्मक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल चंद्रपूरातील समाजसेवी संस्था, क्रीडाप्रेमी नागरिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संघटनांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अभिनंदन करणाऱ्या संस्थांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन आणि आरुषी फाउंडेशनचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुलवाडे दाम्पत्याचे विशेष अभिनंदन करत, “गुलवाडे दाम्पत्याने चंद्रपूर आणि भारताचा गौरव वाढविला आहे,” असे म्हटले आहे.
शहरातील विविध मान्यवरांनीही शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे. यामध्ये डॉ. रितेश दीक्षित, डॉ. सुश्रुत भुकते, डॉ. अशोक वासलवार, डॉ. संजय घाटे, प्रवीण पंत, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. अभय राठोड, डॉ. रुपेश ठाकरे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. नगीना नायडू, डॉ. श्वेता मानवटकर, डॉ. मिलिंद दाभेरे, डॉ. राजेश टोंगे, डॉ. प्रवीण घोडे, डॉ. पियुष लोढे, डॉ. किरण देशपांडे, डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ. शरद रणदिवे, डॉ. नंदकिशोर जोगी, रोटेरियन संदीप रामटेके, रोटेरियन राजेश गणारपवार, रोटेरियन नरेंद्र बोबडे, डॉ. अनुप बांगडे, डॉ. आनंद फुलझेले, डॉ. काशिनाथ गौरकर, डॉ. गजेंद्र गणीगर, CA शादाब चिनी आणि पियुष मेश्राम यांचा समावेश आहे.
गुलवाडे दाम्पत्याच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे चंद्रपूरचा मान अधिक वाढला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शहरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



















