government schemes :सरकारी योजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

0

Government schemes :▪️महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी नवीन डिजिटल पाऊल उचलत ‘सीएम डॅश बोर्ड’ लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शासनाच्या सर्व योजनांची आणि सेवांची माहिती एका ठिकाणी सहज मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत कायदा-सुव्यवस्था, न्यायालयीन प्रकरणे आणि रेरा यांसारख्या विभागांचाही यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

▪️ जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळणार असून यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरणार आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासणार नाही. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असणार आहे.

शेतीसह सर्व योजनांची माहिती आता ‘येथे’ उपलब्ध होणार

cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच  उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून  माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल. माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस’ (S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये  राज्यातील 34 संकेतस्थळांचा समावेश आहे. ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.