जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला.भारताचे पहिले पंतप्रधान ( Jawaharlal Nehru ) जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लहान मुलांसाठी बालदिनाचे खूप महत्व आहे. बाल दिनानिमित्त शाळांमध्ये अभ्यासाऐवजी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनसाचे औचित्य साधत शाळांमध्ये खेळ, भाषणे, वेशभूषा स्पर्धा, विविध प्रकारच्या स्पर्धा अशाप्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस ‘बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची. त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. ते मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या स्वभावामुळे मुलांनाही नेहरु आपलेसे वाटायचे. त्यामुळे मुलं त्यांना चाचा नेहरू या नावाने हाक मारत असत. नेहरुंनी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. ज्यामुळे भविष्यात एक चांगला समाज तयार होण्यास मदत झाली.
बालदिनाचा इतिहास –
बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश पंडित नेहरूंना आदरांजली अर्पण करणे हा आहे. 27 मे 1964 ला पंडितजींचे निधन झाले. लहान मुलांच्या लाडक्या चाचा नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबरला भारतात बाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच मुलांना त्यांच्या हक्कांची आणि शिक्षणाची जाणीव करून द्यावी यासाठी हा दिन साजरा केला जातो.
जगभरात बालदिन 1925 पासून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1954 ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये बाल दिन साजरा करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. पण भारतात मात्र पंडितजींच्या निधनानंतर म्हणजेच 1964 नंतर 14 नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. नेहरूंची जयंती लक्षात ठेवण्यासाठी आणि नेहरुंचे लहान मुलांप्रती असलेले प्रेम लक्षात घेता 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मिंट पाईन ॲपल पुलाव आणि लाल भोपळ्याचे घारगे | Mint Pineapple Pulao Recipe | Epi. 32 |Shankhnaad News