बसखाली चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू

0

अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घटना

अमरावती. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (Government Engineering College) भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू (Death of a student in accident) झाला. ती आपल्या मित्रांसमवेत पंचवटीकडे येत असताना समोरील कारने अचानक ब्रेक दाबले. धडक होऊ नये म्हणून विद्यार्थिनीच्या मित्रानेही करकचून ब्रेक दाबले. मात्र, त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले. इतक्यात एक शहर बस आली अन् तिला चिरडून गेली. काही कळायच्या आत शहर बसचे (city bus) चाक तिच्या डोक्यावरून गेले अन् क्षणात होत्याचे नव्हते. हृदयाला थरकाप सोडविणारा हा अपघातानंतर विद्यार्थ्यी चांगलेच संतप्त झाले होते. नेहा इंगोले (२०, रा. रेवसा) असे मृत तरुणीचे नाव आहे. नेहा ही विदर्भ ज्ञानविज्ञान महाविद्यालय येथील बी.एससी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. सोमवारी दुपारी ती मित्र मिहिर महल्ले (वय २१) याच्यासोबत दुचाकीने जात होती. महाविद्यालयासमोर त्यांच्या दुचाकीसमोरील चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मिहीरलाही दुचाकीचे ब्रेक दाबावे लागले. पण, दुचाकी स्लिप होऊन दोघेही रस्त्यावर कोसळले. मागेच असलेल्या शहर बसचे चाक नेहाच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या वेळी काही प्रत्यक्षदर्शींनी नेहा व मिहीरला खासगी रुग्णालयामध्ये हलविले. तेथे डॉक्टरांनी नेहाला मृत घोषित केले. त्यामुळे तिला इर्विन रुग्णालयात आणण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिच्या मृत्यूला दुजोरा दिला. नेहाचे वडील हे अकोला जिल्ह्यातील आकोट येथे शासकीय नोकरीवर आहेत. आई नसल्याने ती लहानपणापासूनच रेवसा येथे तिच्या आत्याकडे राहत होती. मिहीर महल्ले याच्या नातेवाईकांनी मिहीरला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पंचवटीपासून विदर्भ महाविद्यालयापर्यंत दुतर्फा सिमेंट रोडचे बांधकाम सुरू आहे. तूर्तास राठीनगरपासून गाडगेबाबा मंदिरापर्यंतच्या बाजूने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे राठीनगरमधून पंचवटीकडे येत असताना उजव्या बाजूकडील रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. तेथील अपघात टाळण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने कुठलीही उपाययोजना केलेली नाही.

जोधपुरी गुलाबजामची भाजी आणि कणकेचे वांगे रेसिपी|Gulab Jamun Ki Sabji & kankiche Wangi Recipe|Epi. 52

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा