गहू, तांदूळ, डाळ, चहापत्ती सर्वच महाग ; 20 ते 25 टक्के वाढले किराणा वस्तूंचे दर
नागपूर. सर्वसामान्य नागरिक महागाईच्या आगीत अजूनही होरपळून निघत (common man suffering from inflation ) आहे. कोरोनानंतर तरी महागाई कमी होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, परंतु तसे झाली नाही. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वच वर्गातील लोक त्रस्त झाले आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवर्गीय लोकांना बसत असून त्यांचे महिन्याचे बजेट कोसळले आहे. किचनमधून तूर डाळ तर गायब झालीच, अन्य वस्तू खरेदी करतानाही दमछाक होत आहे. महागाईवर मात करण्यात सरकार व प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. वर्षभराच्या तुलनेत डाळ, तांदूळ, चहापत्ती, कणिक, बेसन, सिलिंडरच्या (Dal, rice, chaipatti, kanik, besan, cylinder ) किमतीत 20 ते 25 टक्के वाढ (Price increase ) झाली आहे. खाद्यतेलही गतवर्षीच्या तुलनेत महागच आहे. लोकांची महिन्याभराची कमाई आठवडाभरात संपत आहे.
आधी खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल आणि आता महागडी डाळ, तांदूळ, पीठ गव्हाच्या वाढत्या किमतीने सर्वांनाच त्रस्त केले आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत चांगलीच भर टाकली आहे. यातून लोकांची दिनचर्यासुद्धा सुटली नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये किरकोळमध्ये 95 ते 100 रुपये प्रतिकिलो मिळणारी तूरडाळ आता 115 ते 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. चणाडाळ 50 ते 55 रुपये सुरू होती, ती आता किरकोळमध्ये 70 रुपये प्रतिकिलो सुरू आहे.
गहू 32 रुपयांपेक्षा कमी नाही
गतवर्षी 27 ते 28 रुपये प्रतिकिलो सुरू असणारा गहू आता 33 ते 40 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गव्हाचा तुटवडा असल्याने याच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. परिणामी पिठासह मैदा आणि रवा आदींचे दर वाढले आहे. आटा मागच्या वर्षी 27 ते 28 रुपये प्रतिकिलो होता, तो आता 31 ते 32 रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. यात थेट 4 ते 5 रुपये प्रतिकिलोने वाढ झाली आहे. तसेच 27 रुपये प्रतिकिलो असणारा मैदा 32 ते 33 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. रवा 33 ते 35 रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहे.
सर्वच वस्तूंमध्ये दरवाढ
गतवर्षी 40 ते 43 रुपयांपर्यंत चांगल्या दर्जाचा तांदूळ मिळत होता, तो आता 47 ते 50 रुपये प्रतिकिलो विकल्या जात आहे. खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन काही प्रमाणात घट झाली. यातूनही सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकला नाही. चहापत्ती 280 रुपये प्रतिकिलोच्या वर सुरू आहे.
वर्षभरात वाढलेल्या किमतीवर एक नजर
वस्तू डिसेंबर 2021 डिसेंबर 2022
कणिक 28 32
मैदा 27 33
रवा 30 35
गहू 28 33
तांदूळ 43 47
तूर डाळ 100 115
चणा डाळ 65 70
चहापत्ती 250 280